शिवाबद्दल आध्यात्मिक माहिती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



अनुक्रमणिका

शिवाबद्दल आध्यात्मिक माहिती


शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्याची पद्धत


पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी व नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी व नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे रहाणे


सनातनच्या साधिकेने बिल्वपत्राचे केलेले `सूक्ष्म-परीक्षण'


सनातन-निर्मित `शिवाची सात्त्विक नामपट्टी'


महानंदीच्या आशीर्वादामुळे साधकाला शिवाकडून ज्ञान मिळणे


महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाने ज्ञान देणे


साधकांच्या अनुभुति


हिंदूंनो, आपल्या `शिव' देवतेची विटंबना रोखा !


`शिव'भक्‍तांनो धर्मशिक्षण घ्या व धर्माभिमानी व्हा !


प्रवचन व प्रश्‍नमंजुषा


शिवविषयक


http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/mahashivratri/index.htm
Read more...

देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये व संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
देववाणी संस्कृत ही सुसंस्कृत व अभिजात भाषा आहे; मात्र संस्कृतद्वेष्ट्यांनी या भाषेला मृतभाषा समजून तिची हेटाळणी केली. ही देवभाषा वाचवण्यासाठी प्रयत्‍न व्हावेत, यासाठी हे सदर. राजा राम मोहन राय यांचा संस्कृतद्वेष`मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीपूर्वी इंग्रजांचे कंपनी सरकार संस्कृत शिक्षणाला अनुदान देत होते. आंग्लविद्या संभ्रमित राजा राम मोहन राय यांनी १८२३ मध्ये त्या वेळच्या राज्यपालांना (गर्व्हनरला) पत्र लिहिले. त्यात म्हटले होते, `शिक्षणाद्वारे एतद्देशियांची सुधारणा व्हावी; म्हणून सरकार कलकत्त्यात संस्कृत पाठशाळा काढत आहे. जशी युरोपमध्ये बेकनच्या पूर्वी अज्ञानस्थिती होती, तशी संस्कृत शिक्षणाने भारताची होईल. ज्याचा अभ्यासकास व समाजास काहीही उपयोग नाही, अशा व्याकरणातील किचकट गोष्टी, वेदांताचा कीस यांमुळे तरुण पिढीचे डोके जडावून जाईल. दोन सहस्र वर्षांपूर्वीचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाईल. संस्कृतचे शिक्षण दिले, तर देश अंधारात बुडून राहील; म्हणून इंग्रजी शिक्षण सुरू करा. दूरवरच्या प्रदेशातून येऊन आमचे कोटकल्याण करण्याची वरप्रद दृष्टी बाळगणार्‍या ज्ञानी सरकारप्रत असलेले कर्तव्य बजावण्यासाठी मी काहीसे स्वातंत्र्य घेऊन माझी भावना आपल्या पुढे व्यक्‍त केली.केवढा हा इंग्रजधार्जिणेपणा व लाचारी ! अशा माणसाला इतिहासकारांनी `महान सुधारक' म्हणून डोक्यावर घेतले. महाराष्ट्रातील तत्कालिन समाजसुधारकसुद्धा त्याच इंग्रजधार्जिण्या मनोवृत्तीचे होते. अशा इंग्रजाळलेल्या लोकांनी इंग्रजी शिक्षणाला स्वीकारले व सर्वोत्कृष्ट भाषा असणार्‍या संस्कृतला अव्हेरले. पहिलीपासून इंग्रजी सुरू करणारे व त्याचे समर्थन करणारे सारे त्याच मेकॉलेचे वंशज आहेत. दुर्दैव हे की, स्वातंत्र्य मिळून अर्धे शतक उलटून गेले, तरी इंग्रज मनोवृत्ती गेलेली नाही. उलट ती वाढत आहे.'संस्कृत भाषेला नामशेष करण्याचा प्रयत्‍न करणारे काँग्रेसवाले !`ब्रिटिश भारतात आल्यापासून संस्कृत भाषेच्या अधोगतीला सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात तिला `मृतभाषा' म्हणून काँग्रेसने जाहीर केले. त्यामुळे अध्यात्मासह व्याकरण, नाट्य, गणित, वास्तूशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी सर्वच विषयांतील सर्वोच्च ज्ञानाला आपण मुकलो. राज्यकर्त्यांनी संस्कृत न शिकवून व तिला `मृत ठरवून' मराठी, तसेच इतर स्थानिक भाषांचा पायाच उद्ध्वस्त केला.' - संकलक डॉ. जयंत आठवले (इ.स. २००७)१. संस्कृत श्लोकसुद्धा उर्दूत लिहिण्याच्या गोष्टी करणारे गांधी ! : `गांधीजींचे हे पत्र म्हणजे `हरिजन' या साप्‍ताहिकासाठी ११ जानेवारी १९४८ रोजी लिहिलेला अग्रलेख; पण त्यात काय लिहिले आहे, याची माहिती वृत्तसंस्थेकडे आली आहे. `मुस्लिमांची भाषा म्एहणून उर्दूला विरोध करणे, ही पाकिस्तानी विद्वेषवादाची नक्कल ठरेल. देवनागरीचा आग्रह धरून उर्दू लिपीला मारून टाकण्याचे प्रयत्‍न निंद्यच ठरतील. उलटपक्षी, सार्वजनिक ठिकाणीही उर्दू लिपीला स्थान देण्यात काही गैर नाही. ही अरबी आणि फारसीपेक्षा वेगळी लिपी आहे.उर्दू ही एक वाढती भाषा आहे. सुधारण्याची क्षमता तिच्यात आहे. काही सुधारणा झाल्या; तर अगदी संस्कृत श्लोकसुद्धा उर्दू लिपीत लिहिता येतील.' - दैनिक महाराष्ट्र टाईम्स (३०.६.२००७)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये व संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय')


संस्कृतची वैशिष्ट्ये व संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय"

Read more...