गणेशोत्सव विशेष - ३

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीच्या मूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ पाहूया.


सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्ती



गणपतीला तुळस न वहाण्याचे कारण
पौराणिक कारण : `एक अप्सरा अती सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला श्री गणपति दिसला. तिला तो फार आवडला; म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या, `हे एकदंता, हे लंबोदरा, हे वक्रतुंडा !' ध्यानाचा भंग झाल्यामुळे गणपतीने डोळे उघडले. तेव्हा त्याला अप्सरा दिसली. तो तिला म्हणाला, `हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ?' ती म्हणाली, `मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.' गणपति म्हणाला, `मी कधीच विवाह करून मोहपाशात पडणार नाही.' त्यावर अप्सरा म्हणाली, `तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.' गणपतीने तिला प्रतिशाप दिला, `तू पृथ्वीवर वृक्ष होशील.' अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, `मला क्षमा कर.' गणपति म्हणाला, `माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील व तू सुखी होशील.' ती अप्सरा पुढे तुळस बनली. गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून गणपतीला तुळस वहात नाहीत.'

अन्य कारण : श्री गणपति ही जास्तकरून सकाम भक्‍तीची देवता आहे, तर तुळस ही वैराग्यदायक आहे; म्हणून गणपतीला तुळस वहाणे निषिद्ध समजतात.

चतुर्थी
इतिहास : गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा व चतुर्थीचा संबंध जोडला गेला.

श्री गणेशजयंती : माघ शुद्ध चतुर्थी ही `श्री गणेश जयंती' म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते.

श्री गणेश चतुर्थी
महत्त्व : विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत जास्त प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रता जास्त असते. त्या तीव्रतेच्या काळात, म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत, गणेशलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येत असल्याने यमलहरींची तीव्रता कमी व्हायला मदत होते. (या लहरींविषयी अधिक माहिती सनातनचा ग्रंथ `सण, धार्मिक उत्सव व व्रते' यात दिली आहे.)
श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ हजार पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

कुटुंबात कोणी करावी ? : `श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे `सिद्धीविनायक व्रत' या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्‍त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) व पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्‍त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी.'

नवीन मूर्तीचे प्रयोजन : पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश याप्रमाणे आहे - श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्‍ती येईल. जास्त शक्‍ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात व ती मूर्ती नंतर विसर्जित करतात. गणपतीच्या लहरींत सत्त्व, रज व तम यांचे प्रमाण ५:५:५ असे आहे, तर सर्वसाधारण व्यक्‍तीत १:३:५ असे आहे; म्हणून गणेशलहरी जास्त वेळ ग्रहण करणे सर्वसाधारण व्यक्‍तीला शक्य नसते.

श्री गणेशाभोवती सजावट करतांना गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या आकृतीबंधाचा वापर करणे : अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. गणेशतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे गणपतीला लाल फूल, दूर्वा, शमीची पत्री, मंदारची पत्री इत्यादी वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही गणेशतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते. (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्री गणपति'. ग्रंथ हवा असल्यास संपर्क : रत्‍नागिरी (०२३५२) २२२३४६, चिपळूण (०२३५५) २५३८०८



--------------------------------------------------------------------------------


श्री गणेश चतुर्थी आदर्शरीत्या साजरी करून गणेशतत्त्वाचा लाभ मिळवूया !
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो. `आपल्या घरात गणपति येणार आहे', या कल्पनेने आपले मन भरून येते. काही कुटुंबांत तर गणेश चतुर्थीची तयारी एक महिना आधीच सुरू होते. संपूर्ण घराची साफसफाई करणे, घराला रंगरंगोटी करणे इत्यादी सेवा सुरू होतात. गणेशोत्सवाला ४-५ दिवस असतांना मोदक, करंज्या बनवणे सुरू होते. या उत्सवात नातेवाईक व मित्रमंडळी घरी येतात; पण नेमकं होतं काय, तर आपण उत्सवामध्ये मनोरंजनात कधी मग्न होतो, हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे `गणपति आपल्या घरी आहे', हेच आपण विसरतो. या उत्सवात आपण करत असलेल्या कृतींतील त्रुटी वगळल्यास व दृष्टीकोन योग्य ठेवल्यास आपल्याला श्री गणेशाचा आध्यात्मिक फायदा पूर्णपणे मिळून श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या कष्टाचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल. काल आपण धार्मिक विधी कशा करायच्या ते पाहिले. आज आपण आरती करतांना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ते पाहूया.

आरती करतांना खालील गोष्टी टाळाव्यात
अ. आरती सुरू झाल्यानंतर अव्यवस्थितपणे उभे रहाणे.
आ. कर्णकर्कश स्वरात व अनेक आरत्या म्हणणे
इ. देवाशी काडीमात्र संबंध नसलेल्या गीतांच्या किंवा चित्रपट गीतांच्या चालीत असलेल्या आरत्या लावणे
ई. आरती चालू असतांना एकमेकांकडे पाहून हसणे, खाणाखुणा व चेष्टा करणे इत्यादी (क्रमश:)

साभार - गणेशोत्सव विशेष - ३

Read more...

Special Series of Ganesh Chaturthi Videos And Articles

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


Special Series of Ganesh Chaturthi Videos


Series of Articles Related to Lord Ganesh



This series of articles contain spiritually scientific information about Lord Ganesh। For details about Ganesh Chaturthi Rituals and Public Ganesh Festival, please visit


this section।


VIDEO : ।hindujagruti.org/videos/index.php?id=6">http://www।hindujagruti.org/videos/index.php?id=6


ARTICLES : http://www.hindujagruti.org/hinduism/knowledge/category/ganapati


गणपतीविषयक - आध्यात्मिक माहिती



अनुक्रमणिका

गणेश जयंतीविषयी ईश्‍वराकडून मिळालेले ज्ञान


गणेश मंत्रांचे महत्त्व


कार्याच्या अनुषंगाने गणपतीची विविध रूपे


गणपतीचे वाहन


शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात ?


श्रीगणेशाशी संबंधित साधकांना आलेल्या अनुभूती


गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या काही रांगोळया


कलाकारांनो, गणपतीचे विडंबन म्हणजे कलात्मकता नव्हे!


विभक्त कुटुंबामध्ये गणपतीपूजन कसे करावे? - ध्वनीचित्रपट


श्री गणपती मध्यपूजाविधी - ध्वनीचित्रपट


श्री गणपती उत्तरपूजाविधी - ध्वनीचित्रपट


गणपतीपूजन व तिथी - ध्वनीचित्रपट


गणेशपूजनासाठी स्वतंत्र मूर्ती का आणावी? - ध्वनीचित्रपट


विविध रूपातील गणेशमूर्ती पूजावी का? - ध्वनीचित्रपट


गणेशमूर्तीच्या पाटाखाली तांदूळ का ठेवावेत? - ध्वनीचित्रपट


गणेशमूर्ती किती दिवस पूजावी? - ध्वनीचित्रपट


सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकार - ध्वनीचित्रपट

Read more...

गणेशोत्सव विशेष - २

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेशाच्या उपासनेमुळे बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते !

भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त
श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीची काही वैशिष्ट्ये पाहू.

विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा
`श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूषित शक्‍ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्‍ती जोर करत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते. `मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले', याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर होऊ लागते.' - प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सर्व संप्रदायांना पूज्य
`आपली उपास्यदेवताच सर्वश्रेष्ठ आहे व तीच विश्‍वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी आहे; अन्य देवता नाहीतच', असे सांप्रदायिक मानतात. संप्रदाय अनेक असले, तरी प्रत्येक संप्रदायात श्री गणेशपूजा आहे. शैव संप्रदायात श्री गणपति हा शिवाचा पुत्र आणि शिवाचा मुख्य गण असा आढळतो, तर वैष्णव संप्रदायात तो अनिरुद्ध, वासुदेव आदी रूपांत आढळतो. शाक्‍त संप्रदायात (देवी संप्रदायात) दक्षिणमार्गी आणि वाममार्गी असे दोन प्रकार आहेत. दोन्हींमध्ये श्री गणेशपूजन केले जाते. या संप्रदायात तो शक्‍तीगणपति, लक्ष्मीगणपति अशा वैवाहिक रूपांत दर्शवला जातो, तसेच स्त्रीरूपातही पुजला जातो. श्री गणेशपूजन जैन पंथातही केले जाते. बौद्ध धर्म स्वीकारणार्‍या सम्राट अशोकाच्या चारुमती नावाच्या कन्येने नेपाळमध्ये श्री गणेशमंदिर बांधले. `हेरंब' या नावाने प्रसिद्धी पावलेला तेथील श्री गणेश सिंहासनाधिष्ठित असून त्याला पाच मस्तके व दहा हात आहेत, असा उल्लेख श्री गणेशसाहित्यात आढळतो.


संतांनी गौरविलेले दैवत

निरनिराळया साधनामार्गांतील संत वेगवेगळया देवतांचे उपासक असले, तरी सर्व संतांनी श्री गणेशाची आळवणी व त्याचे स्तवन आवर्जून केले आहे. सर्व संतांसाठी श्री गणेश ही अतीपूजनीय देवता होती. मराठी संतवाङ्मयातून तर श्री गणेशाचे लौकिक आणि पारलौकिक स्वरूप मोठ्या सुबकरीत्या वर्णन केलेले आढळते. संतशिरोमणी श्री ज्ञानदेवमाउलींनी भावार्थदीपिकेच्या (ज्ञानेश्‍वरीच्या) आरंभी `देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु' असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला पुढीलप्रमाणे प्रथमवंदन केले आहे - `ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या । वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्रीगणेशा ।।' संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला व श्री गणेशाला एकाच वेळी भोजनास बोलावल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांनी `लंबोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।', असे म्हटले आहे. संत तुलसीदासांनीही `रामचरितमानस'च्या आधी श्री गणेशस्तवन केले आहे. (क्रमश:)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणपति')

Read more...

गणेशोत्सव विशेष - १

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीच्या महागणपति या नावाचा अर्थ, तसेच श्री गणपतीचे महत्त्व, कार्य व त्याची वैशिष्ट्ये पाहू.




महागणपति

ऋद्धि-सिद्धि (शक्‍ती) यांच्यासहित असलेला श्री गणपति म्हणजे महागणपति होय. `पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार होय. तिने मृत्तिकेचा आकार करून त्यात श्री गणपतीचे आवाहन केले. जगदुत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण व कूटस्थ स्वरूपात असल्यामुळे महत्तत्त्वास महागणपति म्हणतात. महागणपति जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा निखळ मोक्षप्राप्‍तीस्तव आराधला जातो, तेव्हा उजवीकडे सोंड असलेला श्री गणपति घेण्याची प्रथा आहे; पण अशा वेळी तो शक्यतो पार्थिव श्री गणपति असतो. काही सोन्याचांदीच्या उजव्या सोंडेच्या श्री गणपतीच्या मूर्ती क्वचित आढळतात. `प्रत्येक पुरुषदेवतेची एकेक शक्‍ती मानली जाते, उदा. ब्रह्मा - भारती, श्रीविष्णु - श्री लक्ष्मी, शिव - पार्वती. गाणपत्यांनीही परब्रह्मरूप गणपतीची एक शक्‍ती मानली असल्यास नवल नाही. श्री गणपति त्याच्या शक्‍तीस मांडीवर घेऊन आलिंगन देत असल्याचे शिल्प उपलब्ध आहे. आजही असे रंगवलेले चित्र पहावयास मिळते. त्याचप्रमाणे `सिद्धि' आणि `बुद्धि' या त्याच्या दोन पत्‍नी त्याच्या दोन्ही बाजंूस बसलेल्या आहेत, असेही शिल्प उपलब्ध आहे. या शक्‍तीसह श्री गणपतीला तंत्रशास्त्रात `महागणपति' असे म्हटले आहे।


महत्त्व

कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करण्याचे महत्त्व : पूजास्थानी इतर देवता श्री गणपतीच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करतात. श्री गणपतीने एकदा दिशा मोकळया केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते. यालाच महाद्वारपूजन किंवा महागणपतिपूजन असे म्हणतात. (गाणपत्य संप्रदायात ब्रह्म याऐवजी गणपति व परब्रह्म याऐवजी महागणपति हे शब्द वापरतात.)

कार्य व वैशिष्ट्ये


अ. विघ्नहर्ता : विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन असते.
आ. प्राणशक्‍ती वाढवणारा : मनुष्याच्या शरिरातील निरनिराळी कार्ये निरनिराळया शक्‍तींद्वारे होत असतात. (या निरनिराळया शक्‍तींबद्दल माहिती सनातनच्या `हठयोग' या ग्रंथातील `प्रकरण ६. प्राणायाम' यात दिली आहे.) त्या निरनिराळया शक्‍तींच्या मूलभूत शक्‍तीला `प्राणशक्‍ती' असे म्हणतात. श्री गणपतीचा नामजप प्राणशक्‍ती वाढवणारा आहे. (क्रमश:)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणपति')


हिंदूंनो, गणेशोत्सवातील गैरप्रकार बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्या !

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात चौकाचौकात ध्वनीक्षेपकावर मोठ्याने गाणी लावली जातात. त्यासाठी मोठे ध्वनीवर्धक लावून ही सार्वजनिक मंडळे एकामेकांशी चढाओढ करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते व अवतीभोवती रहाणार्‍या जनतेचे जगणे दुर्धर होऊन जाते. यात त्या मंडळांतील सदस्यांच्या ओरडण्याचीही भर असते. असे ध्वनीवर्धक रात्री उशिरापर्यंत लावले जातात. सार्वजनिक ठिकाणी ध्वनीवर्धकावर मोठ्या आवाजात गाणे लावून अवतीभोवती रहाणार्‍या लोकांना त्रास होईल, असे वर्तन करणे कायद्याने गुन्हा आहे. आपल्याला असा त्रास झाल्यास मंडळांच्या विरोधात पोलिसांत लेखी फिर्याद नोंदवा. त्याची एक प्रत सनातनला पाठवा. पोलीस ठाण्यात जातांना दोन-चार जणांना बरोबर घेऊन जा. ध्वनीमुद्रक घेऊन जा. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिल्यास त्यांच्या वरिष्ठांकडे त्याच्याविरुद्ध तक्रार करा.

निगडीत वृत्त : श्री गणपति विशेष

गणेशोत्सव जनजागृती चळवळीत आपण हे करू शकता !
वक्रमार्गाने चालणार्‍यांना शिक्षा करून सरळ मार्गावर आणणारा तो वक्रतुंड !

Read more...

श्रीकृष्णाच्या संदर्भातील माहिती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
Read more...

गोकुळाष्टमी विशेषांक

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

अनुक्रमणिका
१. तिथी व इतिहास
Read more...

चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण (स्नान)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्या निमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. सध्या आपण स्नानाच्या संदर्भातील आचारांविषयीची माहिती पहात आहोत. त्याअंतर्गत आज आपण सकाळच्या वेळी स्नान का करावे, स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना व स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक या संदर्भातील माहिती पाहूया.


ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी किंवा पहाटे स्नान करावे. स्नान करण्याची ही आदर्श वेळ आहे; परंतु हल्लीच्या काळी त्या वेळी स्नान करणे बहुतेकांना शक्य नसते. असे स्नान करणे शक्य नसल्यास सूर्योदय झाल्यावर जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर स्नान करावे.

५ अ.
दुपारी स्नान करण्यापेक्षा सकाळच्याच वेळी स्नान करावे.
५ अ १. शास्त्र - देहाला स्पर्शणार्‍या आपतत्त्वाच्या लहरींच्या साहाय्याने देहाकडून बाह्य-वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जाणे :
`सकाळच्याच वेळी आंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे; कारण या काळात वायूमंडल सात्त्विक लहरींनी भारित असते. पाण्याच्या माध्यमातून देहाला स्पर्शणार्‍या आपतत्त्वाच्या लहरींच्या साहाय्याने देह बाह्य-वायूमंडलातील लहरी ग्रहण करण्यात अतीसंवेदनशील बनल्याने आपोआपच त्याच्याकडून बाह्य-वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जातात; परंतु आता कलीयुगात सर्व उलटेच चालले आहे. बायका आधी घरातील कामे करून त्यानंतर घाम येतो म्हणून नंतर आंघोळ करून मग वेणी घालतात. दुपारच्या वेळी वायूमंडलात रज-तमात्मक लहरींचा संचार वाढल्याने व आंघोळीच्या वेळी देह बाह्य-वायूमंडलातील लहरी ग्रहण करण्यात संवेदनशील बनल्याने तो उलट रज-तमात्मक लहरीच ग्रहण करतो व अशा तर्‍हेने देहाची बाह्यशुद्धी साधली गेली, तरी अंत:शुद्धी होत नाही.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

५ आ. रात्री स्नान करण्यापेक्षा सकाळी स्नान करावे. आ १. शास्त्र - सकाळी स्नान केल्यावर स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्त प्रमाणात वाढून ती दीर्घकाळ टिकणे व रात्री ती अल्पकाळ टिकणे : `सकाळची वेळ सात्त्विक असल्यामुळे सकाळी स्नान केल्यावर स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्त प्रमाणात वाढते आणि ती दीर्घकाळ टिकून रहाते. रात्रीची वेळ तमोगुणी असल्यामुळे त्या वेळी स्नान केल्यामुळे स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता कमी प्रमाणात वाढते व अल्पकाळ टिकते. त्यामुळे त्या व्यक्‍तीला स्नानाचा लाभ फार कमी प्रमाणात होतो.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री ११.१३)

६. स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना व स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
६ अ. जलदेवतेला करावयाची प्रार्थना :
`हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझ्या स्थूलदेहाभोवती आलेले रज-तम यांचे काळे आवरण नष्ट होऊ दे. बाह्यशुद्धीप्रमाणे माझे अंतर्मनही स्वच्छ व निर्मळ होऊ दे.'

६ आ. नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान करण्याचे महत्त्व
६ आ १. शास्त्र :
`नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान केल्याने पाण्यातील अंगीभूत चैतन्य जागृत होऊन त्याचा देहाला स्पर्श होऊन चैतन्याचे संक्रमण पेशीपेशींपर्यंत होते व त्यामुळे देहाला देवत्व प्राप्‍त होऊन दिवसभरातील कृती चैतन्याच्या स्तरावर करण्यास देह सक्षम बनतो.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.१०.२००७, दुपारी १.२३)

६ इ. स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
१. गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।
अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू व कावेरी, तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.

२. गंगा सिंधू सरस्वति च यमुना गोदावरि नर्मदा ।
कावेरि शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
र्क्षिैं वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी ।
पूर्णा:पूर्णजलै:समुद्रसहिता:कुर्वन्तु मे मंगलम् ।।
अर्थ : गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेन्द्रतनया, चंबळा, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (माळव्यातील बेतवा नदी), प्रख्यात महासुरनदी, जया आणि गण्डकी या नद्या पवित्र व परिपूर्ण होऊन समुद्रासहित माझे कल्याण करोत.

३. नमामि गंगे तव पाद पंकजं सूरासूरै: वंदित दिव्य रूपम् ।
भुक्‍तिं च मुक्‍तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।
अर्थ : सर्व ऐहिक सुख, भोग व मोक्ष देणार्‍या हे गंगामाते, प्रत्येकाच्या भावानुसार तुझे जे चरणकमल सर्व देव आणि दैत्य यांना वंदनीय आहेत, अशा तुझ्या चरणांना मी वंदन करतो.


स्नान करण्याची पद्धत

७ अ. स्त्रियांनी आधी वेणी घालून मगच स्नान करणे योग्य
७ अ १. शास्त्र - वेणी घालण्याच्या प्रक्रियेतून देहात झालेल्या रज-तमात्मक लहरींचे संक्रमण आंघोळीच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होणे :
`कित्येक स्त्रीया केस विस्कटतात, म्हणून आंघोळ झाल्यानंतर वेणी घालतात; परंतु आधी वेणी घालून मगच आंघोळ करण्याची पद्धत आहे. वेणी घालण्याच्या प्रक्रियेतून देहात जे काही रज-तमात्मक लहरींचे संक्रमण झालेले असते, ते आंघोळीच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होते. उलट आंघोळीनंतर वेणी घातल्याने देह परत अशुद्ध होतो. यावरून असे लक्षात येते की, कलीयुगातील मनुष्य फक्‍त बाह्य स्वच्छेतेकडे, म्हणजेच देहाच्या बाह्य सौंदर्याकडे पहाणारा बनलेला असून तो जीवनाचे अध्यात्मीकरण करण्याच्या सिद्धांतापासून, म्हणजेच खर्‍या आचारापासून दूर गेलेला आहे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)

७ अ २. अनुभूती - आंघोळीनंतर वेणी घातल्यामुळे चेहर्‍यावर काळे आवरण येण्याचे प्रमाण वाढणे व आंघोळीपूर्वी वेणी घातली असता चेहर्‍यावर आवरण येण्याचे व डोक्यावर दाब जाणवण्याचे प्रमाण कमी होऊन उत्साह जास्त वेळ टिकून रहाणे : `लहानपणापासूनच मला आंघोळ करण्यापूर्वी वेणी घालण्याची सवय होती. १९९१ साली मी महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर ती सवय सुटली. तेव्हा मी आंघोळीनंतर वेणी घातल्यामुळे माझ्या चेहर्‍यावर काळे आवरण येण्याचे प्रमाण वाढले. या तुलनेत आंघोळीपूर्वी वेणी घातली असता `चेहर्‍यावर आवरण येण्याचे व डोक्यावर दाब जाणवण्याचे प्रमाण कमी होऊन माझा उत्साह जास्त वेळ टिकून रहातो', असे मला जाणवले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मी पुन्हा आंघोळीपूर्वी वेणी घालण्यास सुरुवात केली आहे.' - कु. स्वप्ना जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

७ आ. नग्न होऊन स्नान करू नये.
७ आ १. शास्त्र - वाईट शक्‍तींचा त्रास होऊ नये म्हणून नग्न होऊन स्नान करू नये :
`नग्नता ही पूर्णपणे देहातील छिद्रांतून सूक्ष्म रज-तमात्मक वायू ऊत्सर्जनाला पूरक ठरणारी स्थिती असते. ही स्थिती वातावरणात स्वत:चे असे एक रज-तमात्मक वायूभारित मंडल बनवते. योनीमार्गातून किंवा गुदद्वारातून होणारे टाकाऊ वायूंचे सूक्ष्म-ऊत्सर्जन बाह्य वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या स्पर्शामुळे वेगाने सुरू झाल्याने या मार्गांकडे पाताळातून प्रक्षेपित होणारी त्रासदायक स्पंदने आकृष्ट होऊन संपूर्ण देह रज-तमाने भारित होतो. या स्थितीत स्नान केल्याने स्नानाचा विशेष फायदा होत नाही. याउलट अंतर्वस्त्राने कटिबंध क्षेत्रात निर्माण होणार्‍या दबावदर्शक प्रक्रियेमुळे मणिपूरचक्र जागृत स्थितीत राहून टाकाऊ वायूंचे आतल्याआतच पोकळीत विघटन करते. मणिपूरचक्र जागृत स्थितीत आल्याने स्नानातून मिळणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्यास देह संवेदनशील बनतो. याचा फायदा जिवाला मिळून त्याच्यासाठी स्नान हा आचार मंगलकारी होतो.' - एक विद्वान
(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, रात्री ८)

७ इ. स्नान करतांना मांडी घालून बसावे.
७ इ अ. शास्त्र :
`उभ्याने स्नान केल्याने आपल्या अंगावरील मालीन्यासह जमिनीवर आदळणारा पाण्याचा प्रवाह जमिनीतील काळया शक्‍तीस्थानांना जागृत करतो. त्यामुळे जमिनीतून काळया शक्‍तीचे कारंजे उसळून परत आपल्या देहाला रज-तमयुक्‍त बनवते. यासाठी स्नान करतांना मांडी घालून बसावे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६) (क्रमश:)




Read more...

चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण (स्नानाचे प्रकार)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
स्नानाच्या संदर्भातील आचार


१. स्नानाचे महत्त्व : `स्नान केल्याने जिवाच्या देहाभोवती आलेले काळे आवरण व जिवाच्या देहातील रज-तम यांचे उच्चाटन होऊन जिवाच्या देहातील पेशी-पेशी चैतन्य ग्रहण करण्यास पोषक होतात. तसेच तोंड धुणे व शौचक्रिया यांमुळे जिवाच्या देहातून बाहेर न पडलेल्या त्रासदायक घटकांचे स्नानाच्या माध्यमातून विघटन होते.' - एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १९.६.२००७, दुपारी ३.५१)

२. स्नान केल्याने होणारे फायदे
२ अ.
`स्नानामुळे जिवाच्या देहातील रज-तम कणांचे प्रमाण कमी होऊन जीव वायूमंडलात प्रक्षेपित होत असलेल्या सत्त्वलहरी सहजतेने ग्रहण करू शकतो.

२ आ. स्नान केल्यामुळे जिवाच्या बाह्यमंडलात स्थिरता येण्यास मदत होते. त्यामुळे स्नानानंतर देवपूजा करतांना जीव वृत्ती अंतर्मुख करून वायूमंडलाशी पटकन एकरूप होऊ शकतो व वायूमंडलाच्या पोषकतेच्या अनुषंगाने देवतेच्या लहरी ग्रहण करू शकतो.'

२ इ. प्रात:स्नानाचे फायदे
२ इ १. प्रात:स्नानाने (सकाळी केलेल्या स्नानाने) तेजोबल व आयुष्य वाढते आणि दु:स्वप्नांचा नाश होतो.
२ इ २. `सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केल्याने जीव अंतर्-बाह्य शुद्ध होऊन त्या काळातील सात्त्विक लहरी ग्रहण करू शकतो.'
- श्री गणपति (कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, ११.१०.२००५, दुपारी १२.२५)

३. स्नानाचे प्रकार : हे समजून घेण्यापूर्वी काळाच्या संदर्भातील पुढील माहिती समजून घेणे आवश्यक आहे. सूर्योदयापूर्वी २ घटिका (४८ मिनिटे) `उष:काल' असतो. उष:काल म्हणजे अंधार संपून उजेड दिसायला लागण्याचा काळ. यालाच `तांबडे फुटायला लागले', असे म्हणतात. उष:कालाच्या पूर्वीच्या ३ घटिका (७२ मिनिटे, म्हणजे १ तास १२ मिनिटे) `ब्राह्ममुहूर्तकाल' असतो. सूर्योदयाच्या वेळेनुसार उष:काल व ब्राह्ममुहूर्तकाल यांच्या वेळाही बदलतात.

३ अ . ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे : `ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे, म्हणजे जिवाद्वारे देवपरंपरेचे पालन करणे. ब्राह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे `देवपरंपरा' या श्रेणीत येते. देवपरंपरेमुळे जिवाला पुढील लाभ होतात.

३ अ १. जिवावर शुद्धता, पवित्रता व निर्मळता हे संस्कार होणे : `ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी जिवाचा मनोदेह स्थिर-अवस्थेत असतो. त्यामुळे त्या कालावधीत स्नान केल्याने जिवावर शुद्धता, पवित्रता व निर्मळता हे संस्कार कालाच्या आधारे होतात.

३ अ २. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी प्रक्षेपित होत असलेले ईश्‍वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास जीव समर्थ बनणे : ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी देवतांच्या लहरी अन्य कालापेक्षा जास्त पटीने कार्यरत असतात. `स्नान करणे' यासारख्या प्रत्यक्ष आवाहनदर्शक कृतीच्या माध्यमातून देवतांचे तत्त्व जिवाकडे आकृष्ट होते. तसेच या कालावधीत जिवावर स्नानाच्या माध्यमातून झालेल्या स्थूल व सूक्ष्म स्वरूपांच्या संस्कारांमुळे जीव ब्राह्ममुहूर्तावर प्रक्षेपित होत असलेले ईश्‍वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास समर्थ होतो.

३ अ ३. ईश्‍वराच्या पूर्णात्मक चैतन्याशी एकरूप होता येणे : शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता या तीन संस्कारांच्या माध्यमातून जिवाला ईश्‍वराच्या संकल्प, इच्छा आणि क्रिया या तीन प्रकारच्या शक्‍ती व या तीन शक्‍तींच्या अनुषंगाने ज्ञानशक्‍तीही ग्रहण करता येऊन ईश्‍वराच्या पूर्णात्मक चैतन्याशी एकरूप होता येते.'
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ७.१०.२००६, दुपारी ५.५९)
Read more...

चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण ( लादी पुसणे )

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्या निमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. आज आपण लादी पुसण्याच्या संदर्भातील आचारांविषयीची माहिती पाहूया.


लादी पुसण्याच्या संदर्भातील आचार

लादी कधी पुसावी ?
केर काढून झाल्यावर लगेच लादी पुसावी.

लादी कशी पुसावी ?
अ. लादी पुसण्यासाठी वापरायच्या पाण्यात चिमूटभर विभूती घालावी.
अ १. शास्त्र : विभूतीतील सात्त्विक शक्‍तीमुळे विभूतीयुक्‍त पाण्याने लादी पुसल्यावर वाईट शक्‍तींमुळे लादीवर आलेले काळे थर नष्ट होण्यास मदत होते.
आ. जलदेवतेला प्रार्थना : लादी पुसण्यापूर्वी `वाईट शक्‍तींमुळे जमिनीवर आलेले काळे आवरण पाण्यातील चैतन्याने नष्ट होऊ देत', अशी जलदेवतेला प्रार्थना करावी.
इ. खाली वाकून उजव्या हाताने ओल्या कापडाने लादी पुसावी.
इ १. वाकून उजव्या हाताने लादी पुसण्याने होणारी प्रक्रिया : `वाकून उजव्या हाताने लादी पुसण्यातून निर्माण होणार्‍या मुद्रेतून मणिपूरचक्राशी असलेले पंचप्राण कार्यरत स्थितीत आल्याने कमी कालावधीत देहातील तेजरूपी चेतना कार्य करण्यास सिद्ध होते. या सिद्धतेतूनच सूर्यनाडी जागृत होऊन उजव्या हातातून तेजाचा प्रवाह लादी पुसण्याच्या कापडात संक्रमित होऊन तो पाण्यातील आपतत्त्वाच्या स्तरावर भूमीशी संलग्न असे तेजाचे कवच निर्माण करतो. म्हणूनच `लादी पुसणे' ही प्रक्रिया एकप्रकारे जमिनीवर तेजाचे कवच निर्माण करणारी असल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांना अवरोध केला जाऊन वास्तूचे रक्षण होण्यास मदत होते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, सायं. ७.३२)
ई. केर काढतांना जसे तो आतून बाहेरच्या दिशेने, म्हणजे दरवाज्याच्या दिशेने पुढे पुढे ढकलत नेतात, त्याचप्रमाणे लादीही दरवाज्याच्या दिशेने पुसत यावी.
उ. लादी पुसण्यासाठी वापरत असलेले ओले कापड मधे मधे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
लादी पुसून झाल्यावर उदबत्ती लावून घरात निर्माण झालेली सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी वास्तूदेवतेला प्रार्थना करावी.

यंत्राच्या साहाय्याने लादी पुसण्याने होणारे तोटे

अ. वास्तू दूषित होणे : `यंत्राच्या साहाय्याने लादी पुसतांना जमिनीशी संलग्न होणार्‍या घर्षणात्मक नादाकडे पाताळातील त्रासदायक लहरी वेगाने आकृष्ट होतात व या लहरी पाण्यातील आपतत्त्वाच्या साहाय्याने जमिनीवर पसरवल्या जातात. यामुळे यांत्रिक पद्धतीने लादी पुसण्यातून त्रासदायक लहरींचे आवरण जमिनीवर निर्माण होऊन जमीन या लहरी स्वत:त घनीभूत करून ठेवण्यास सिद्ध बनते. यामुळे वास्तू दूषित होते.
आ. हाडे व स्नायू यांचे विकार होणे : यांत्रिक पद्धतीने जमीन पुसण्यातून निर्माण होणार्‍या त्रासदायक लहरींमुळे पायांच्या स्नायूंचे विकार, हाडांचे विकार, हाडे झिजणे, सांधेदुखी असे त्रास होऊ शकतात.
इ. वाईट शक्‍तींचा जास्त त्रास होऊ शकणे : यांत्रिक पद्धतीने जमीन पुसतांना ती शक्यतो वाकून न पुसता उभ्या स्थितीतच पुसली गेल्याने विशिष्ट मुद्रेच्या अभावामुळे सूर्यनाडी जागृत न झाल्याने यांत्रिक पद्धतीने लादी पुसण्यातून निर्माण झालेल्या त्रासदायक लहरींपासून देहमंडलाचेही रक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे जिवाला वाईट शक्‍तींचा जास्त त्रास होऊ शकतो; म्हणून वाकून यंत्रविरहित, म्हणजेच उजव्या हाताने फरशी पुसणे जास्त लाभदायक आहे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, सायं. ७.३२)
Read more...

अमृतवाणी संस्कृतभाषा !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्रावण पौर्णिमा ! हा दिवस रक्षाबंधनाबरोबरच `संस्कृतदिन' म्हणूनही साजरा केला जातो. त्या निमित्ताने संस्कृतबद्दलचा अभिमान जागवण्याचा हा एक प्रयत्‍न !


देववाणी संस्कृत
रत्‍नागिरीसंस्कृतची आजची स्थिती पाहण्याअगोदर संस्कृत भाषेचा उद्भव कसा झाला, ते पाहूया. आपल्या वैदिक परंपरेने विश्‍वनिर्मितीपासूनचा साद्यंत इतिहास जतन करून ठेवला आहे. प्रथम सर्वत्र शून्य होते. मग `ॐ' असा ध्वनी अवकाशात निनादला. शेषषायी श्रीविष्णु प्रगट झाले. त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटले. त्यानंतर प्रजापती, मातृका, धन्वंतरी, गंधर्व, विश्‍वकर्मा आदी निर्माण झाले. याच वेळी विश्‍वाचे ज्ञानभांडार ज्यात सामावले आहे, असे वेद ईश्‍वराने उपलब्ध करून दिले. वेद संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत ही `देववाणी' आहे. वेद जसे अपौरुषेय म्हणजे ईश्‍वरप्रणीत आहेत, तशीच संस्कृत भाषाही ईश्‍वरनिर्मित आहे. तिची रचना व लिपी ईश्‍वराने निर्माण केली आहे; म्हणून त्या लिपिलाही `देवनागरी' म्हणतात. संस्कृत भाषेची सर्व नावेही ती देवभाषा असल्याचे स्पष्ट करतात, उदा. `गीर्वाणभारती' हे नाव पहा. त्यातील `गीर्वाण' या शब्दाचा अर्थ `देव' असा आहे. रानटी अवस्थेतील मानवाने पशू-पक्ष्यांच्या आवाजांचे अनुकरण करून भाषा तयार केली असावी, हे पाश्चात्त्यांचे अनुमान योग्य नाही. माता-पिता आणि कुटुंबीय बालकाशी सतत बोलून त्याला भाषा शिकवतात, म्हणून मूल बोलायला शिकते. क्रूरकर्मा अकबराने एक प्रयोग करून बघितला. त्याने काही अर्भकांना एका जंगलात ठेवले. त्या अर्भकांना सांभाळणार्‍या सेवकांना त्याने तंबी देऊन ठेवली की, त्या मुलांच्या कानावर एकही शब्द पडता नये. १० वर्षांनी या मुलांना अकबरासमोर आणण्यात आले. त्या वेळी त्या मुलांना एकही शब्द उच्चारता आला नाही. ती सर्व मुले मुकीच राहिली होती. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग या तीन युगांमध्ये संस्कृत हीच विश्‍वाची भाषा होती. त्यामुळे तिला `विश्‍ववाणी'ही म्हणतात. अगदी कौरव-पांडवांच्या काळापर्यंत संस्कृत हीच विश्‍वातील एकमेव भाषा होती. कौरव-पांडवांच्या त्या महाभारतीय युद्धानंतर वैदिक म्हणजेच हिंदूंचे विश्‍वसाम्राज्य हळूहळू आक्रसत आल्यावर संस्कृत भाषेचीही मोडतोड होऊन तिच्या वेड्यावाकड्या प्रादेशिक उच्चारातून अन्य भाषा निर्माण झाल्या. त्यामुळेच इंग्रजीसारख्या भाषांमध्ये संस्कृतशी साम्य दाखवणारे शब्द विपुल प्रमाणात आढळतात, उदा. गायीला संस्कृतमध्ये `गौ', तर इंग्रजीत `cow' म्हणतात, दाताला `दंत' तर इंग्रजीत `dentt' म्हणतात.

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ !

प्रश्‍न असा पडतो की, समृद्ध असणार्‍या `गीर्वाणवाणी' संस्कृतला एकदम उतरती कळा का लागली ? अमूल्य असा हा वैश्‍विक ठेवा आपण गमावून का बसलो ? मुसलमान आक्रमकांनी जाळपोळ करून आमच्या संस्कृत ग्रंथांची राखरांगोळी केली, तर इंग्रजांनी आमच्या वैदिक शिक्षणव्यवस्थेची पाळेमुळेच उखडून टाकली. कारकून तयार करणार्‍या त्यांच्या शिक्षणप्रणालीमुळे इंग्रजी मन आणि मेंदू असलेला हिंदु नागरिक निर्माण झाला. परिणामी संस्कृतचे जतन जेवढ्या प्रमाणात व्हायला हवे होते, तेवढे झाले नाही. संस्कृतची अशी स्थिती झाल्यामुळे गेल्या शतकात ही भाषा नामशेष होते कि काय, असे वाटू लागले होते. शाळांमध्ये संस्कृत शिकणारे विद्यार्थी नाहीत म्हणून शिक्षक नाहीत आणि शिक्षक नाहीत म्हणून विद्यार्थी नाहीत, असे चित्र दिसत होते. त्यातच स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या पंतप्रधानपद भोगलेल्या नातवाने (राजीव गांधी यांनी) संस्कृतला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला `मृत भाषा' असे संबोधून कुर्‍हाडीच्या दांड्याची भूमिका निभावली. हिंदुद्वेषामुळे संस्कृतला `मृत' म्हणणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की, आजही अनेक नियतकालिके, पुस्तके संस्कृतमध्ये प्रकाशित होतात. आकाशवाणी व दूरदर्शन यांवरून प्रतीदिन संस्कृतमधून वार्तापत्रे सादर केली जातात. मंगल कार्यांत संस्कृत मंत्रपठण केले जाते. घराघरांतून संस्कृतमधून स्तोत्रे म्हटली जातात. हे सर्व पाहून संस्कृत भाषेला `मृत' म्हणण्याचे धाडस करणार्‍यांची कीवच येते !

`संस्कृति: संस्कृताश्रिता: ।'

वास्तविक पहाता जगातील सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत. त्यामुळे एखादी भाषा शिकतांना संस्कृतचा आधार घेतल्यास ती शिकणे अधिक सोपे जाते. व्याकरणकर्ता पाणिनीने संस्कृत भाषेचे व्याकरण सूत्रबद्ध व नियमबद्ध रीतीने मांडले आहे. एवढे सर्व असतांना फारसे काटेकोर नियम नसणारी, लेखनाप्रमाणे उच्चार नसणारी आणि शब्द भांडारातही दरिद्री असणारी इंग्रजी भाषा पहिलीपासून शिकवण्याचा अट्टाहास का केला जातो ? आता मात्र संस्कृतला चांगले दिवस येत आहेत. विद्यार्थी आपणहून संस्कृतकडे वळत आहेत. संगणकीय प्रणालीतही संस्कृतचा वापर सर्व भाषांपेक्षा चांगला होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. जगाच्या प्रारंभापासून असलेली संस्कृत भाषा जगाच्या अंतापर्यंत राहील, हे सांगायला कोणा होराभूषणाची गरज नाही. `संस्कृति: संस्कृताश्रिता: ।' असे म्हणतात. संस्कृती ही संस्कृतच्या आश्रयाला असते. म्हणजे जेथे संस्कृतचे अध्ययन होते, तेथे संस्कृती वास करते. संस्कृतचा अभ्यास करणारी व्यक्‍ती ही संस्कृतीशील, सौजन्यशील असते. ही देववाणी असल्याने तिचे उच्चार जरी कानावर पडले, तरी आनंद वाटतो.

सरल मधुर ही संस्कृत भाषा

`सुरस सुबोधा विश्‍वमनोज्ञा ललिताहृद्या रमणीया । अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा, नच कठीना ।।' या काव्यपंक्‍तीत वर्णन केल्याप्रमाणे संस्कृत भाषा ही खरोखरच `अमृतवाणी' आहे. संस्कृतप्रेमी, संस्कृतचे शिक्षक, विद्यार्थी आणि हिंदु धर्माभिमानी यांनीच आता संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत; कारण संस्कृत आणि संस्कृती यांचा फार जवळचा संबंध आहे !

साभार : अमृतवाणी संस्कृतभाषा !

Read more...

रक्षा (राखी) बंधन

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. तो श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

१. इतिहास
अ. `पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्‍तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमा होता.' लक्ष्मीने बळीराजाला घातलेल्या बंधनाविषयी संस्कृतमध्ये एक श्लोक आहे.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
अर्थ : महाबली व दानवेन्द्र असा जो बली राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे राखी, तू चलित होऊ नकोस.
आ. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून सुरू झाली.

२. भावनिक महत्त्व : राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे रक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषत: तरुणांचा व पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो.

३. रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व : रक्षाबंधनामुळे बहीण व भाऊ यांना होणारा आध्यात्मिक लाभ म्हणजे त्यांच्यातील देवाणघेवाण हिशोब कमी होणे. या जन्मात व्यक्‍ती एखाद्याची नातेसंबंधी असण्यामागील महत्त्वाचे आध्यात्मिक कारण असते त्यांच्या आधीच्या जन्मांतील कर्मांमुळे एकमेकांना सुख व दु:ख देण्याच्या दृष्टीने त्यांच्यात निर्माण झालेला हिशोब.ज्याला अध्यात्मशास्त्रात `देवाणघेवाण हिशोब', असे म्हटले जाते. या हिशोबापायी त्या त्या नातेसंबंधातून आपल्याला सुख वा दु:ख अनुभवायला मिळत असते. बहीण व भाऊ यांचा एकमेकांत साधारण ३० टक्के इतका देवाण-घेवाण हिशोब असतो. तो राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून कमी होतो. हा आध्यात्मिक लाभ अधिकाधिक होण्यासाठी बहिणीने भावाकडून अपेक्षा बाळगू नये व भावाने बहिणीला सात्त्विक ओवाळणी द्यावी. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगू नये. तशी अपेक्षा बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्‍या या आध्यात्मिक लाभापासून वंचित रहाते.







४. राखी बांधणे : तांदूळ, सोने व पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी तयार होते.

५. प्रार्थना करणे : बहिणीने भावाच्या कल्याणासाठी व भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच दोघांनीही `राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्‍न होऊ देत', अशी ईश्‍वराला प्रार्थना करावी.

६. राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखूया ! : हल्ली राखीवर `ॐ' किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्तत: पडल्यामुळे एकप्रकारे देवता व धर्मप्रतीक यांचे विडंबन होते आणि यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !


साभार : Raksha Bandhan
Read more...

चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण ( केर काढणे )

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्या निमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. आज आपण केर काढण्याच्या संदर्भातील आचारांविषयी माहिती पाहूया.


१. केर कधी काढावा ?
अ. `घर घाणेरडे झाले असेल, तर भावपूर्णरीत्या नामजप करत क्षात्रभाव ठेवून कुठल्याही वेळी केर काढावा. असे केले तरच केर काढण्याच्या कृतीतून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांचा देहावर प्रभाव पडणार नाही.
१ आ. स्वत:ला कर्मबंधनाचा आचाररूपी नियम लागू करून सकाळीच, म्हणजेच रज-तमात्मक क्रियेला अवरोध करणार्‍या वेळेतच हे कर्म उरकून घ्यावे
१ इ. सायंकाळी केर न काढणे : सकाळी एकदाच केर काढावा. सायंकाळी केर काढू नये; कारण या वेळी वायूमंडलात रज-तमात्मक स्पंदनांचा संचार मोठ्या प्रमाणात चालू असल्याने केर काढण्याच्या रज-तमात्मक क्रियेशी संबंध असलेल्या या प्रक्रियेतून वाईट शक्‍तींचा घरात शिरकाव होण्याची शक्यता अधिक असते. सकाळचे वायूमंडल सत्त्वप्रधान असल्याने हे वायूमंडल केर काढण्याच्या रज-तमात्मक क्रियेतून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांवर यथायोग्य अंकूश ठेवते; म्हणून या क्रियेचा कुणालाच त्रास होत नाही.

२. केरसुणीने केर कसा काढावा ?

२ अ. केर काढतांना कमरेत उजव्या बाजूला झुकून उजव्या हातात केरसुणी धरून केर मागून पुढच्या दिशेने ढकलत न्यावा.
२ अ १. कमरेत वाकण्याने होणारी प्रक्रिया : `केर काढतांना कमरेत वाकल्याने नाभीचक्रावर दाब येऊन पंचप्राण जागृत अवस्थेत रहातात. केर गुडघ्यात वाकून कधीच काढू नये; कारण या मुद्रेमुळे गुडघ्याच्या पोकळीत साठलेल्या किंवा घनीभूत झालेल्या रज-तमात्मक वायूधारणेला गती मिळण्याची शक्यता असे. त्यामुळे या मुद्रेत केर काढल्यास केर काढतांना पाताळातून वायूमंडलात उत्सर्जित होणारी त्रासदायक स्पंदने देहाकडे आकृष्ट होण्याची भीती असते; म्हणून रज-तमात्मकतेचे देहात संवर्धन करणारी अशी कृती शक्यतो टाळावी.
२ अ २. उजव्या बाजूला झुकल्याने होणारी प्रक्रिया : उजव्या बाजूला झुकून केर काढल्याने देहातील सूर्यनाडी जागृत रहाते व तेजाच्या स्तरावर देहाचे जमिनीतून उत्सर्जित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होते.'
- एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.१०.२००७, दुपारी ५.२०)

२ आ. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावे.
२ आ १. केर काढत पूर्व दिशेला गेल्यास केरातील रज-तम कण व लहरी यांमुळे पूर्वेकडून येणार्‍या देवतांच्या लहरींच्या मार्गात अडथळा निर्माण होणे : `पूर्व दिशेकडून देवतांच्या सगुण लहरींचे पृथ्वीवर आगमन होत असते. कचरा हा रज-तमात्मक असल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे केर काढतांना कचरा व धूळ यांचे पूर्व दिशेने वहन होऊन त्यांद्वारे रज-तम कण व लहरी यांचे प्रक्षेपण होऊन पूर्व दिशेकडून येणार्‍या देवतांच्या सगुण तत्त्वाच्या लहरींच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे केर काढत पूर्वेकडे जाणे अयोग्य आहे. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जाऊ शकतो.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री १०.५५) (क्रमश:)

संदर्भ : अध्यात्मविषयक ग्रंथ `दिनचर्येशी संबंधित आचार व त्यांमागील शास्त्र'

Read more...

मूर्तीकार व गणेशभक्‍त यांना आवाहन

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अध्यात्मशास्त्रदृष्ट्या देवतेच्या मूळ रूपाशी जास्तीतजास्त साधर्म्य असणार्‍या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व अधिकाधिक आकृष्ट होते. अशा मूर्तीमुळे भक्‍तामध्ये भावनिर्मिती सहज होते. असे होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व मूर्तीविज्ञान यांनुसार श्री गणेशमूर्ती चिकणमातीपासून बनवलेली, पारंपरिक पद्धतीची, पाटावर बसलेली, नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगवलेली असावी.
शास्त्रानुसार मूर्ती कशी असावी, हे समजण्यासाठी सनातनतर्फे सात्त्विक मूर्तीचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे। पुढील आकृतीत दाखवलेली ३४.५ सें.मी. उंचीची श्री गणेशमूर्ती एक प्रमाण म्हणून दिली आहे. आपल्याला ज्या आकाराची मूर्ती बनवून घ्यावयाची असेल, त्या आकारानुसार त्या प्रमाणात मूर्तीची मापे बदलतील.
सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

आकृतीतील क्रमांकांचे विवरण खाली दिले आहे.


गणपतीविषयक - आध्यात्मिक माहिती


गणेश जयंतीविषयी ईश्‍वराकडून मिळालेले ज्ञान


गणेश मंत्रांचे महत्त्व


कार्याच्या अनुषंगाने गणपतीची विविध रूपे


गणपतीचे वाहन


शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात ?


श्रीगणेशाशी संबंधित साधकांना आलेल्या अनुभूती


गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या काही रांगोळया


कलाकारांनो, गणपतीचे विडंबन म्हणजे कलात्मकता नव्हे!


विभक्त कुटुंबामध्ये गणपतीपूजन कसे करावे? - ध्वनीचित्रपट


श्री गणपती मध्यपूजाविधी - ध्वनीचित्रपट


श्री गणपती उत्तरपूजाविधी - ध्वनीचित्रपट


गणपतीपूजन व तिथी - ध्वनीचित्रपट


गणेशपूजनासाठी स्वतंत्र मूर्ती का आणावी? - ध्वनीचित्रपट


विविध रूपातील गणेशमूर्ती पूजावी का? - ध्वनीचित्रपट


गणेशमूर्तीच्या पाटाखाली तांदूळ का ठेवावेत? - ध्वनीचित्रपट


गणेशमूर्ती किती दिवस पूजावी? - ध्वनीचित्रपट


सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकार - ध्वनीचित्रपट

Read more...

चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्या निमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. आज आपण विविध स्वरूपाचे आचार व त्यांचे पालन कसे करावे, याविषयी पाहूया.
विविध स्वरूपाचे आचारस्मृतींनुसार आचार

१. अत्रीस्मृतीतील आचार : अत्रीऋषींनी या स्मृतीत सांगितलेल्या आचारधर्मातील काही ठळक आचार पुढे दिले आहेत.
१ अ. सुवासिनी स्त्रियांनी त्यांच्या पतीच्या आज्ञेविना उपवास, तप, व्रते इत्यादी करू नयेत.
१ आ. सुवासिनी स्त्रियांनी त्यांच्या पतीलाच स्वत:चे सर्वस्व समजावे.
१ इ. वेदांइतके पवित्र ज्ञान नाही, मातेपेक्षा श्रेष्ठ गुरु नाही व दानासारखा मित्र नाही.
१ ई. दुष्काळात अन्नदान करणारा, सुकाळात सुवर्णदान करणारा आणि निर्जल प्रदेशात पाणपोईची व्यवस्था करणारा यांना स्वर्ग प्राप्‍त होतो.
१ उ. अन्नदान, सुवर्णदान व जलदान या दानांपेक्षाही विद्यादान श्रेष्ठ आहे.

२. यमस्मृतीतील आचार : कर्मफल व आचारधर्म यांसंबंधीचे नियम या स्मृतीत विशद केले आहेत, उदा. तलाव, विहिरी व देवालये यांचा जीर्णोद्धार करणार्‍याला ती नवीन बांधल्याचे पुण्यफळ मिळते.

३. पराशरस्मृतीतील आचार : या स्मृतीत कलीयुगात पाळावयाचा आचारधर्म दिला आहे. या स्मृतीत सांगितलेले काही आचार पुढीलप्रमाणे आहेत.
३ अ. मीठ, मध, तेल, दही व दूध कोणाकडूनही विकत घेतल्यास घेणार्‍याला दोष लागत नाही.
३ आ. ब्राह्मणाने चांगले आचरण करणार्‍या शुद्राच्या घरी तूप, दूध, तेल व गूळ यांचे पदार्थ सेवन करण्यास हरकत नाही.
३ इ. वैश्य व क्षत्रिय यांच्या घरी देव व पितृ कार्य करणार्‍या ब्राह्मणाने अन्नसेवन करण्यास हरकत नाही. ३ ई. योग्य कारणावाचून स्त्रीचा त्याग करणारा ७ जन्म स्त्री होऊन वैधव्याचे दु:ख भोगतो.
३ उ. पतीच्या आज्ञेशिवाय पत्नीने व्रत करू नये.

४. शंकस्मृतीतील आचार : या स्मृतीत प्रत्येकाचे वर्णोचित नाव कसे असावे व विशेषकरून स्त्रीने कसे वागावे, या संदर्भातील नीतीनियमांचे वर्णन केले आहे.
४ अ. ब्राह्मणाच्या नावाच्या शेवटी `शर्मा', क्षत्रियाच्या नावाच्या शेवटी `वर्मा', वैश्याच्या नावाच्या शेवटी `गुप्‍त' व शूद्राच्या नावाच्या शेवटी `दास' असे उपपद लावावे.
४ आ. कुलीन स्त्रीने वेश्या, चेटूक करणारी, कपटी व व्यभिचारी स्त्रीच्या आणि धूर्त पुरुष व संन्यासी यांच्या सहवासात राहू नये.

५. वसिष्ठस्मृतीतील आचार : सर्वसामान्य व्यक्‍तीलाही आचरणात आणता येतील, अशा सोप्या सदाचारांचे महत्त्व या स्मृतीत सांगितले आहे. त्याचबरोबर सज्जन व दुर्जन कोणाला म्हणावे, याच्या व्याख्याही या स्मृतीत दिल्या आहेत.' आचारांचे पालन कसे करावे ?

१. `मृत्यूने माझे केस पकडले आहेत', असे समजून धर्माचे आचरण करणे आवश्यक :
अजराऽमरवत्प्राज्ञो विद्यामर्थं च चिन्तयेत् ।
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ।।
आहरेज्ज्ञानमर्थांश्च नरो ह्यमरवत्सदा ।
केशैरिव गृहीतस्तु मृत्युना धर्ममाचरेत् ।। - हितोपदेश, कथामुखं ३
अर्थ : बुद्धीमान मनुष्याने स्वत:ला अजरामर जाणून विद्या व धन मिळवावे आणि `मृत्यूने माझे केस पकडले आहेत (मृत्यूच्या हातात आपली शेंडी आहे)', असे समजून धर्माचे आचरण करावे.

२. नित्यनैमित्तिक कर्मे कर्तव्यबुद्धीने व अनासक्‍तीने आमरण आचरणे आवश्यक :
`आपली सहजकर्मे (नित्यनैमित्तिक कर्मे) कर्तव्यबुद्धीने व अनासक्‍तीने आमरण आचरलीच पाहिजेत. चित्तशुद्धी ही या जन्मी नव्हे, तर अनेक जन्मांच्या अंती प्राप्‍त झाली, तर कैवल्याची वाटचाल करता येणे शक्य होते.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

३. सर्व कर्मे भगवंताला समर्पण केल्यामुळे होणारा आचरणशुद्धीचा लाभ सर्वश्रेष्ठ असणे :
`श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्‌गीतेत (९.२७) सांगितले आहे, `जे काही सेवन कराल, हवन-यज्ञ कराल, तपादी कर्मे कराल, ती सगळी भगवंताला समर्पित करा.' असे केल्याने काही निषिद्ध व चुकीचे घडणारच नाही. अभक्ष्यभक्षण व अपेयपान घडणार नाही. मांस निषिद्ध असल्याने प्राणीजिवांचे हनन होणार नाही. निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तंूचे दान होणार नाही. मग जे पहायला हवे, तेच डोळयांनी पाहिले जाईल; जे ऐकायला हवे, तेच कानांनी ऐकले जाईल व जे बोलायला हवे, तेच वाणी बोलेल. अशी सगळी इंद्रिये जे करायला हवे, तेच करतील. समर्पणामुळे होणारा आचरणशुद्धीचा हा सर्वश्रेष्ठ लाभ होय.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
निगडीत : हिंदूंनो धर्मशिक्षण घ्या!

मैत्री दिनाचा देखावा कशाला ? : 2008-08-07
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण : 2008-08-04
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण : 2008-08-03
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मप्रबोधन : 2008-07-27
गणेश चतुर्थी : 2008-07-27
महाव्रत : एकादशी : 2008-07-27
धर्मसत्संग : 2008-07-24
चातुर्मासाचे आध्यात्मिक महत्त्व : 2008-07-15
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवा ! : 2008-07-04
पादत्राणे घालून पूजन केले व नारळ वाढवला ! : 2008-06-१२
Read more...

चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
वास्तूत रहाणार्‍या व्यक्‍तीच्या चांगल्या अथवा वाईट प्रवृत्तीचा परिणाम वास्तूवर होतो !

आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्यानिमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. काल आपण आचारधर्म पाळल्यामुळे व्यष्टीच्या संदर्भात होणारे अंतर्शुद्धी व इतर फायदे पाहिले. आज `वास्तूशुद्धी' विषयी माहिती जाणून घेऊया।




आचारधर्म पाळल्यामुळे होणारे फायदे
१ ई. वास्तूशुद्धी
१ ई १. अर्थ : वास्तूतील त्रासदायक स्पंदने नष्ट करून चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे वास्तूशुद्धी.
१ ई २. वास्तूदोष : वास्तूची अयोग्य रचना, वास्तूवर सातत्याने होणारे रज-तम कणांचे आघात, वास्तूत राजसिक-तामसिक प्रवृत्तीच्या व्यक्‍ती रहात असल्यास त्यांच्यामुळे निर्माण होणारी त्रासदायक स्पंदने, वाईट शक्‍तींचा त्रास इत्यादींचा परिणाम वास्तूवर होतो. त्यामुळे वास्तूत त्रासदायक स्पंदने, म्हणजे वास्तूदोष निर्माण होतो.
१ ई ३. वास्तूशुद्धीची आवश्यकता : वास्तूदोषामुळे वास्तूत रहाणार्‍यांच्या जीवनात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक व आध्यात्मिक अडथळे येतात. वास्तूदोषामुळे साधकांच्या साधनेतही अडथळे येतात.

१ ई ४. वास्तूशुद्धीच्या काही पद्धती
अ. वास्तूमध्ये दररोज गोमूत्र किंवा विभूतीचे पाणी (विभूती घातलेले पाणी) शिंपडावे व विभूती फुंकरावी.
आ. वास्तूमध्ये दररोज सकाळ-संध्याकाळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा व उदबत्ती लावावी, तसेच धूप घालावा.
इ. देवघरात देवाचे चित्र पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून ठेवावे.
ई. घरातील सर्वांनी एकत्र येऊन देवाला प्रार्थना करावी, थोडा वेळ नामजप करावा व देवतांची स्तोत्रे म्हणावीत.
उ. भिंतींवर देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल करून त्याद्वारे सूक्ष्म-छत (संरक्षककवच) करावे. (याविषयी सविस्तर माहिती सनातनचे हस्तपत्रक `वास्तूशुद्धी व वाहनशुद्धी यांसाठीच्या काही सुलभ पद्धती' यात दिली आहे.)
ऊ. घरातील सर्वांनी आचार-विचार चांगले ठेवावेत.
ए. तीव्र वास्तूदोष असल्यास वास्तूशांती करावी.

२. काम-क्रोधादी विकारांना नष्ट करण्याचे सामर्थ्य आचारधर्मात असणे : `हिंदूंच्या आचारांत शरीरशुद्धी व मानसशुद्धी आहे, शिवाय वासनांवरील नियंत्रण आहे. हिंदूंचे आचार ईश्‍वराभिमुख करणारे व पापापासून रक्षण करणारे आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर या षड्रिपूंवरील नियंत्रणाची व्यवस्था आचारधर्मात आहे.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

३. दु:खांचा नाश करण्याचे सामर्थ्य आचारधर्मात असणे
युक्‍ताहारविहारस्य युक्‍तचेष्टस्य कर्मसु ।
युक्‍तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा ।।
- श्रीमद्भगवद्‌गीता, ६.१७

अर्थ : जो आहार-विहार, झोपणे-जागणे, व्यवहार व आपले प्रत्येक कर्म नियमित आणि यथायोग्य करतो, त्यालाच योग प्राप्‍त होऊन त्याच्या दु:खांचा नाश होतो.(क्रमश:)
Read more...